दिल्लीच्या सीमेजवळील अरवली पर्वतरांगांमधील १३८ पैकी २८ टेकडया गायब झाल्या आहेत. बेकायद खाणकाम प्रकरणावर सुनावणी सुरु असताना राजस्थान सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. न्यायमूर्ती मदन.बी.लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांना राज्य सरकारचा हा युक्तीवाद अजिबात पटला नाही. नागरिकांनी हनुमान बनून टेकडया पळवल्या का ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारला.

बेकायद खाणकामाचा विषय राजस्थान सरकारने फारच सौम्यतेने घेतला आहे. न्यायालयाने पुढच्या ४८ तासात अरवली पर्वतरांगांमधील ११५.३४ हेक्टरवरील बेकायद खाणकाम बंद करण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालयाने गायब झालेल्या त्या टेकडयासंबंधी माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमधून गायब झालेल्या या टेकडयांमुळे दिल्लीमध्ये प्रदूषण वाढले असावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.