News Flash

२८ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीची हत्या; ख्रिसमची लाईटिंग पाहून रचला होता कट

पोलिसांकडून आरोपी पतीला अटक

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे २८ वर्षीय व्यक्तीने ५१ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ५१ वर्षीय शखाकुमारी यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील परिसरात आढळला होता. प्राथमिक चौकशीदरम्यान पती अरुण याने घरात ख्रिसमच्या निमित्ताने करण्यात आलेल्या रोषणाईमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शखाकुमारी शनिवारी सकाळी अरुणने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात अरुणने पत्नीला शॉक लागल्याचा दावा केला होता. तपासादरम्यान पोलिसांना घरात रक्ताचे डाग दिसल्याने शंका आली. यामुळे यामागे काहातरी काळंबेरं असल्याची शंका पोलिसांना आली.

आणखी वाचा- महिलेने पाच महिन्याच्या बाळाला जिवंत पेटवलं; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

काही महिन्यांपूर्वीच दांपत्याचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर त्यांच्यात सतत वाद होत होते. अरुण वारंवार घटस्फोटाची मागणी होत असतानाही शखाकुमारी मात्र नकार देत होती. अरुणने याआधीही एकदा पत्नीला शॉक देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अपयशी ठरला. अरुणने पत्नीची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. चौकशीदरम्यान अरुणने आपला गुन्हा कबूल केला असून वीजेचा शॉक देऊन पत्नीची हत्या दिल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 9:44 am

Web Title: 28 year old kerala man electrocutes 51 year old wife sgy 87
Next Stories
1 युनायटेड किंग्डममध्ये अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीने २८० वेळा मागितली माफी
2 आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाही; जदयूचा भाजपाला इशारा!
3 RSS स्वयंसेवकाने घरात घुसून बलात्कार केला; महिलेच्या आरोपानं खळबळ
Just Now!
X