News Flash

देशात २४ तासांत २८ हजार रुग्ण

देशात आतापर्यंत ५.५ लाख रुग्ण करोनामुक्त

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

देशात गेल्या २४ तासांमध्ये २८ हजार ७०१ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ झाली. देशात आतापर्यंत ५.५ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

गेल्या २४ तासांत १८ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. १९ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर २.६४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या २३ हजार १७४ झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. करोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतल्याने राज्यात मृतांची एकूण संख्या १०,४८२ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:37 am

Web Title: 28000 patients in 24 hours in the country abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रेमडेसीवीर, टोसिलिझुमाब औषधांचा वापर प्रमाणातच हवा
2 भारत-चीन लष्करांदरम्यान आज उच्चस्तरीय चर्चेची चौथी फेरी
3 ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांकडे महत्त्वाची खाती
Just Now!
X