भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासात २८ हजार ७०१ नवे रुग्ण सापडले असून ५०० जणांच मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजार रुग्ण सापडले आहेत. रविवारी २८ हजार ६३७ रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान सध्याच्या घडीला देशात ३ लाख १ हजार ६०९ करोनाबाधित रुग्ण असून ५ लाख ५३ हजार ४७१ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत २३ हजार १७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
28,701 new COVID19 cases & 500 deaths reported in India in the last 24 hours. Total positive cases stand at 8,78,254 including 3,01,609 active cases, 5,53,471
cured/discharged/migrated and 23,174 deaths: Ministry of Health pic.twitter.com/wEBpsyXnSs— ANI (@ANI) July 13, 2020
राज्यातील रुग्णसंख्या अडीच लाखांवर
राज्यात करोनाच्या ७,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार झाली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये राज्यातील करोनाबाधितांची संख्या ५० हजाराने वाढली. गेल्या २४ तासांत राज्यात १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही १०,२८९ झाली. दरम्यान, रविवारी दिवसभरात एक हजार २६३ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून, एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ७२० इतकी झाली आहे. गेल्या ४८ तासांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 10:11 am