News Flash

चीनमधील पुरात २९ ठार

चीनच्या ईशान्य भागांत गेल्या आठवडय़ापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी कोसळण्याचे प्रकार यामुळे किमान २९ जण ठार झाले असून अन्य १४ जण बेपत्ता

| August 18, 2013 12:10 pm

चीनच्या ईशान्य भागांत गेल्या आठवडय़ापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि दरडी कोसळण्याचे प्रकार यामुळे किमान २९ जण ठार झाले असून अन्य १४ जण बेपत्ता झाले आहेत, असे वृत्त मीडियाने दिले आहे.
हेलॉँगजिआंग, लिआओनिंग आणि जिलीन प्रांतात आलेल्या पुरामुळे १४ हजार लोकांना अन्य जागी स्थलांतरित करावे लागले आहे. पुरात आतापर्यंत २९ जण ठार झाले आहेत, असे झिनुआने म्हटले आहे. गेल्या दशकातील हा मोठा पूर आहे.
हेलॉँगजिआंग येथे पुरात २५०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून अन्य १२ हजार ५०० घरांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. पूर आणि वादळ यामुळे १८.१५ दशलक्ष डॉलरचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेनयांग प्रांतातील पाच हजारांहून अधिक अधिकारी आणि सैनिकांना मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागांत बोटी आणि वाहनेही पाठविण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 12:10 pm

Web Title: 29 drown if flood in china
Next Stories
1 भारतीय वंशाचे विजय सिंग यांना पर्यावरणातील सर्वोच्च पुरस्कार
2 घुसखोरांच्या हल्ल्यात १० ठार
3 १५ ऑगस्टला भारतात स्फोट घडविण्याचा बेत होता!
Just Now!
X