29 October 2020

News Flash

Good News: दिल्लीत २९ टक्के लोकांच्या शरीरात करोनाविरोधात अँटीबॉडीजची निर्मिती, सिरो सर्वेतून आलं समोर

करोनामुक्त झाल्यानंतर शरीरात तयार होतात अँटीबॉडीज

दिल्लीकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कोविड-१९ विरोधात दिल्लीत २९ टक्क्यापेक्षा जास्त लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्वेमधून ही बाब समोर आली आहे.

एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्वेचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. करोनामुळे दिल्लीत नेमकी काय स्थिती आहे, ते समजून घेण्यासाठी हा सिरो सर्वे करण्यात आला. दिल्लीतील २९.१ टक्के जनतेच्या शरीरात करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात जास्त अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. ३२.२ महिला तर २८.३ टक्के पुरुषांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या.

दिल्लीमध्ये २७ जून ते १० जुलै दरम्यान पहिला सिरो सर्वे करण्यात आला होता. त्यात २४ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले होते. अँटीबॉडीज तयार होणे याचाच अर्थ करोना व्हायरसची बाधा होऊन त्यातून बरे होणे. अँटी बॉडीज म्हणजे शरीरात करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे. पहिल्या सिरो सर्वेनंतर दिल्ली हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जात असल्याचे संकेत आहेत असे तज्ज्ञांनी सांगितले होते.

करोनाचा दिल्लीत नेमका किती प्रादुर्भाव झाला आहे, त्याचा सामना करण्यासाठी काय उपायोजना कराव्या लागतील, पुढचे निर्णय कसे घेतले पाहिजेत, त्यासाठी हा सिरो सर्वे करण्यात आला. दुसऱ्या सिरो सर्वेमध्ये वेगवेगळया भागातून, वयोगटातून १५ हजार नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. राजधानी दिल्लीच्या ११ जिल्ह्यातून हे नमुने गोळा करण्यात आले. या आधीच्या सिरो सर्वेमध्ये जे सहभागी होते, त्यांना दुसऱ्या सर्वेत वगळण्यात आले. दिल्लीची एकूण लोकसंख्या दोन कोटीच्या आसपास आहे. सध्या वेगवेगळया देशात लस निर्मितीचे काम सुरु आहे. त्यातही लसीमुळे शरीरात अँटीबॉडीज कितपत तयार होतात ते तपासले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:50 pm

Web Title: 29 in delhi developed covid 19 antibodies shows new sero survey dmp 82
Next Stories
1 देशात करोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाखांवर; चोवीस तासांत ६९,६५२ नव्या रुग्णांची नोंद
2 पूर आणि अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या चीनच्या किनारपट्टीला धडकले ‘हिगोस’ वादळ
3 पोलीस अधिकाऱ्याने पेटीएमवरुन दोन हजारांची लाच घेतल्याचा आरोप
Just Now!
X