News Flash

पाकिस्तानात रेल्वे-बस टक्कर, २९ जण ठार

मृतांमध्ये पाकिस्तानातील बहुसंख्य शीख यात्रेकरू

| July 4, 2020 03:16 am

मृतांमध्ये पाकिस्तानातील बहुसंख्य शीख यात्रेकरू

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शुक्रवारी पाकिस्तानातील शीख यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक मिनी-बस मानवरहित रेल्वे फाटकाजवळ एका एक्स्प्रेस गाडीवर धडकल्याने झालेल्या अपघातात किमान २९ जण ठार झाले. मृतांमध्ये पाकिस्तानातील बहुसंख्य शीखांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मिनी-बसमध्ये बहुसंख्य शीख यात्रेकरू होते आणि ते पंजाबच्या नानकाना साहिब येथून परतत असताना बस कराचीहून लाहोरला येत असलेल्या शाह हुसेन एक्स्प्रेसवर फारूकाबाद येथे आदळली. या अपघातामध्ये २९ जण ठार झाले असून त्यामध्ये पाकिस्तानमधील बहुसंख्य शीखांचा समावेश आहे, असे इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे (ईटीपीबी) प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी सांगितले.

बसमधील यात्रेकरू फारूकाबादमधील गुरुद्वारा सच्चा सौदा येथे जात होते, ते पेशावर येथून नानकाना साहिब येथे आले होते, तेथे राहून ते पेशावरला जाणार होते. ईटीपीबीच्या सुरक्षा दलाने त्यांना नानकाना साहिबपर्यंत संरक्षण दिले होते, असे हाश्मी यांनी सांगितले.

या अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य पथक घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी जखमींना जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयात दाखल केले, असे रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणी रेल्वेच्या विभागीय अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे आदेश रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:16 am

Web Title: 29 killed in train bus collision in pakistan zws 70
Next Stories
1 फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा
2 जुलैमध्ये होणा-या NEET, JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या
3 दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके
Just Now!
X