पाल्कच्या सामुद्रधुनीनजीक मासेमारी करणाऱ्या तामिळनाडूच्या २९ मच्छीमारांना सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. तसेच या मच्छीमारांनी मासेमारीकरीता निषिद्ध केलेली जाळी वापरल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हे मच्छीमार बांधव रामेश्वरम् आणि मंडपम् येथील आहेत. तीन दिवसांपूर्वी लंकेच्या नौदलाने केलेल्या हल्ल्यांत एक मच्छीमार जखमी झाला होता. तसेच या महिन्याच्या सुरुवातीसही विविध कारणास्तव ६९ मच्छीमारांना लंकेच्या नौदलाने अटक केली होती. केंद्राने या प्रश्नी लक्ष घालावे अशी आग्रही मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केली आहे.