देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ४२९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ३६ हजार १८१ वर पोहोचली आहे. देशभरात आणखी २० हजार ५७२ रुग्ण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ५ लाख ९२ हजार ३१ रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण ३ लाख १९ हजार ८४० रुग्ण उपचाराधीन आहेत.

बरे होणाऱ्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६३.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५८२ मृत्यू झाले असून, आतापर्यंत २४ हजार ३०९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अधिकाधिक होत असलेल्या चाचण्या, वेळेवर होणारे निदान आणि प्रभावी उपचार या प्रामुख्याने तीन बाबींमुळे रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

राज्यात आणखी ७,९७५ जण बाधित

राज्यात रुग्णवाढीचा वेग कायम असून, ७,९७५ नव्या रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात २३३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णसंख्या पावणेतीन लाखांवर गेली असून, आतापर्यंत राज्यात १०,९२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.