टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याप्रकरणी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्या संभाषणाच्या सीडी न्यायालयापुढे ठेवण्यासाठी सीबीआयने केलेल्या याचिकेला माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी विरोध दर्शविला. स्पेक्ट्रम वाटपप्रकरणी राडिया यांच्या संभाषणाच्या सीडी आणि त्याचा छापील वृत्तांत न्यायालयापुढे ठेवण्याची मागणी सीबीआयने केली होती. त्याला राजा यांनी विरोध केला. ए. राजा हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. 
सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या न्यायालयापुढे दाखल केलेल्या अर्जामध्ये राजा यांनी संबंधित सीडी आरोपपत्र दाखल करताना का सादर करण्यात आल्या नाहीत, याचा कोणताच खुलासा सीबीआयने केलेला नाही, असा युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी नऊ जुलैला होणार आहे.