News Flash

ग्रेनेड हल्ल्यात ३ नागरिक जखमी

रस्त्याशेजारी स्फोट होऊन ३ नागरिक जखमी झाले.

श्रीनगरच्या बर्बरशाह भागात दहशतवाद्यांनी शनिवारी सुरक्षा दलांवर केलेल्या हातबॉम्ब हल्ल्यात किमान ३ नागरिक जखमी झाले.  क्रालखुद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्बरशाह भागात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व जम्मू- काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकावर हातबॉम्ब फेकला. त्याचा रस्त्याशेजारी स्फोट होऊन ३ नागरिक जखमी झाले. सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 1:59 am

Web Title: 3 civilians injured in grenade attack akp 94
Next Stories
1 अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स  कंपनीला भारतीय राजदूतांची भेट
2 पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारी 
3 स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने  लसीकरणाला चालना द्या- मोदी
Just Now!
X