News Flash

तब्बल ३ कोटी लोकांनी रोजगार गमावला

पीएलएफएसच्या सव्रेक्षणातील दाहक वास्तव

(संग्रहित छायाचित्र)

पीएलएफएसच्या सर्वेक्षणातील दाहक वास्तव

नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांमध्ये घरकाम व शेतमजुरीतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संख्येत तब्बल ३ कोटींची घट झाली आहे. त्यात ७.३ टक्के पुरुष मजूर आणि ३.३ टक्के महिलांचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पीरिओडिक लेबर फोर्स सर्वेमध्ये (पीएलएफएस) समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची नुकसान भरपाई करण्यासाठी शहरांमध्येही रोजगार वाढला नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसंदर्भात २०१७-१८ चा पीएलएफएस सव्‍‌र्हे नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार घरकाम व        शेतमजुरीतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संख्येत कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रातील लोकांना मोठय़ा प्रमाणात शेतीतून रोजगार मिळत असून त्याचे उत्पन्नही चांगले आहेत. पण, ग्रामीण भागातील अशा उत्पन्नामध्येही १० टक्क्याने घट झाली आहे. २०११-१२ मध्ये शेतमजुरीतून उत्पन्न मिळवणाऱ्या कामगारांचे प्रमाण २१ टक्केहोते. आता ते प्रमाण १२.१ टक्क्यावर आले आहे. पूर्वी ३ कोटी ६० लाख लोकांना यातून उत्पन्न मिळत होते. आता ते २ कोटी १० लाखांवर आले आहे. रोजगारासंदर्भात एनएसएसओचा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाकडून (एनएससी) डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. पण, अद्यापही तो प्रसिद्ध झाला नाही. हा अहवाल रोखून धरल्याचा आरोप झाल्यानंतर एनएससीचे प्रभारी अध्यक्ष  पी.एन. मोहनन आणि दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर पीएलएफएसचा २०१७-१८ चा अहवाल प्रसिद्ध झाला असून २०११-१२ पासून आतापर्यंत देशात ३०.४ टक्के पुरुषांनी रोजगार गमावला आहे, तर दुसरीकडे स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांच्या संख्येत ४ टक्क्यांची वृद्धी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:21 am

Web Title: 3 crore people lost their job in the last seven years
Next Stories
1 ६८ जणांचा मृत्यू झाला, याला कोणीच जबाबदार नाही; समझोता एक्स्प्रेस बॉंबस्फोट निकालावर ओवेसी नाराज
2 शिवसेनेचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट
3 ऑनलाइन जाहिरातीत पक्षपातीपणा, युरोपीयन संघाचा गुगलला १.१९ अब्ज युरोंचा दंड
Just Now!
X