बिहारची राजधानी पाटणा येथे ३ महिन्याच्या गरोदर बकरीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पाटणाच्या परसा बाजार परिसरात मंगळवारी सायंकाळी एका दारुड्याने बकरीवर बलात्कार केला.त्यानंतर त्या बकरीचा मृत्यू झाला. बकरीची मालकीण असलेल्या महिलेने पोलिसात धाव घेतल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद सिमराज नावाच्या इसमाने दारूच्या नशेत घराबाहेर बांधलेल्या बकरीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मोहम्मद सिमराज हा माधेपुरा येथील रहिवासी असून तो रोजनदारी काम करणारा कामगार आहे. तीन महिन्याची गरोदर असलेली बकरी महिलेच्या घराबाहेर बांधून ठेवली होती. सायंकाळच्या सुमारास मद्यप्राशन करून आलेल्या मोहम्मद सिमराज याने बकरीला पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे त्या बकरीचा मृत्यू झाला. बकरीचा मृतदेह घराबाहेर आढळल्यानंतर मालकीण महिलेने पोलिसात धाव घेतली.

दरम्यान, मोहम्मद सिमराज याने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्यावर भारतीय दंड विधान आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.