18 January 2021

News Flash

दंतेवाडा सुकमा सीमेवर ३ नक्षली ठार

सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षली ठार

दंतेवाडा-सुकमा सीमेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार झाले आहेत. या चकमकीत डीआरजी असिस्टंट कॉन्स्टेबल हितेंद्र पुजारी जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे असे समजते आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून एक 303 रायफल आणि इतर हत्यारे आणि काडतुसे जप्त केली आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

चकमकीदरम्यान तीन नक्षली ठार झाल्याची माहिती डीआयजी पी सुंदरराज यांनी दिली आहे. दंतेवाडा या ठिकाणी नक्षली आणि सुरक्षा दलांची चकमक झाली या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

याआधी ४ जुलैला नारायणपूर जिल्ह्यातील संयुक्त पोलीस दलाने जंगलात शोध मोहिम सुरु केली होती. या मोहिमेदरम्यान २ नक्षल्यांना ठार करण्यात त्यांना यश आले होते. तसेच ४ जुलैलाही मोठ्या प्रमाणावर हत्यारे आणि काडतुसे गोळा करण्यात आली होती अशी माहिती पुढे येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 7:16 pm

Web Title: 3 naxals killed in encounter with security forces in dantewada sukma border
Next Stories
1 केंद्राने सुप्रीम कोर्टाचे आदेश मानले नाहीत तर देशात अराजक माजेल : केजरीवाल
2 बुराडी सामूहिक आत्महत्येमागे गीता माँचा आदेश
3 FB बुलेटीन: गोपाळ शेट्टींचे बेताल वक्तव्य, वादग्रस्त फोटोनंतर रितेशची माफी आणि अन्य बातम्या 
Just Now!
X