News Flash

अपंगांना ३ टक्के आरक्षण देण्याचा केंद्राला आदेश

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांतील सर्व पदे आणि सेवांमध्ये अपंगांसाठी ३ टक्के आरक्षण उपलब्ध करून द्यावे

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांतील सर्व पदे आणि सेवांमध्ये अपंगांसाठी ३ टक्के आरक्षण उपलब्ध करून द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, अपंगांचे आरक्षण केवळ ‘अ’ व ‘ब’ गटातील पदांवर पदोन्नतीपुरते मर्यादित करणारा केंद्र सरकारचा पूर्वीचा आदेश रद्दबातल ठरवला आहे.

सरकारने अशाप्रकारचे आरक्षण ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीपुरते मर्यादित ठेवले होते. १९९७ व २००५ साली जारी केलेल्या आदेशात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) थेट भरतीद्वारे भरावयाची आणि पदोन्नतीद्वारे भरावयाची पदे असा भेद केला होता. ‘अ’ आणि ‘ब’ गटांच्या श्रेणींमध्ये पदोन्नतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी अपंगांना कुठलेही आरक्षण दिले जाणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 12:26 am

Web Title: 3 percent reservation for handicapped in government jobs
Next Stories
1 तारुषी जैनचा मृतदेह आज भारतात आणणार
2 आमदारपुत्र सिद्धार्थचे पाचपट जास्त मद्यप्राशन!
3 विवरणपत्र सादर न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दंड
Just Now!
X