News Flash

‘गोध्रा’नंतरच्या जाळपोळ प्रकरणात तीस आरोपींची निर्दोष मुक्तता

या प्रकरणांची सुनावणी दहा वष्रे चालली, त्यात तीन आरोपी मरण पावले.

| April 6, 2016 12:45 am

गुजरातमध्ये गोध्रा जळीतकांडानंतरच्या दंगलीत जाळपोळ व लुटालूट केल्याच्या आरोपावरून तीस आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्त केले आहे. पुराव्याअभावी त्यांची मुक्तता झाली आहे. प्रसारमाध्यमातील बातम्यामुसार २८ फेब्रुवारी २००२ रोदी बनासकांठा जिल्हय़ातील थारा खेड्यात वििहप व इतर संघटनांनी गुजरात बंदची हाक दिलेली असताना वेगवेगळ्या घटनात वीस दुकाने व ३६  घरे जाळली गेली होती. याप्रकरणी अज्ञात व्यिक्तविरोधात दोन खटले दाखल केले होते, पण पोलिसांनी गुजरात उच्च न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिल्यानंतर ३३ आरोपींची नावे सांगितली होती. या प्रकरणांची सुनावणी दहा वष्रे चालली, त्यात तीन आरोपी मरण पावले.

उरलेल्या आरोपींना जामीन मिळाला व आता सत्र न्यायाधीश एन.एम परमार यांनी पुरेशा पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गोध्रा येथे रेल्वे पेटवल्याच्या घटनेत ५९ िहदू कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. गोध्रा रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेनंतर गुजरातेत दंगल व िहसाचार झाला, त्यात एक हजार लोकांचे हत्याकांड झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:45 am

Web Title: 30 accused acquitted in godhra case
Next Stories
1 पाकिस्तानला अमेरिकेकडून नऊ व्हायपर हेलिकॉप्टर्स
2 पनामा कागदपत्रांतील भारतीयांना प्राप्तिकर खात्याच्या पूर्वीच नोटिसा
3 क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआयने काहीच केले नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारले
Just Now!
X