मध्य प्रदेशात अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३० हजार आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार करतानाच त्यांना वाममार्गास लावण्यात आल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कांतीलाल भुरिया यांनी एका निवेदनाद्वारे ही बाब मांडली असून, भाजपच्या राजवटीत कायदा सुव्यवस्था मोडीत निघाल्यामुळे या समस्येची मुळे आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये आढळतील, असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेकडे गांभीर्याने बघण्याऐवजी पोलीस आणि प्रशासन ती नित्याची बाब असल्याचे भासवत आहेत, असा आरोप भुरिया यांनी केला. हे प्रकरण हाताळण्यास राज्य सरकार असमर्थ ठरल्यामुळे असले धंदे करणाऱ्यांचे फावले आहे, असेही त्यांनी सांगितले.