07 March 2021

News Flash

नशीबच रुसलं! ज्योतिरादित्य आणि माधवराव सिंधियांचा हा योगायोग ठाऊक आहे?

नशीबच रुसलं अशी भावना माधवराव सिंधियांच्या मनात होती तशीच ती आता ज्योतिरादित्यांच्या मनातही असेल

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड जाहीर करण्यात आली. राहुल गांधींनी घेतलेल्या या निर्णयामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ज्याप्रकारे प्रचार केला आणि काँग्रेसला उभारी आणण्याचे काम केले त्यावरून असे वाटले होते की त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार. मात्र तसे घडले नाही, कमलनाथ यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागली आणि सिंधिया यांची संधी थोडक्यासाठी हुकली.

असाच काहीसा किस्सा ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधियांच्या बाबतीतही झाला होता. 1989 मध्ये अर्जुन सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना राजीव गांधींनी पद सोडण्यास सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी माधवराव सिंधिया यांची निवड होणार असेच वाटले होते. मात्र तसे घडले नाही, माधवराव सिंधिया यांनी दोन दिवस काय घडते आहे याची वाट पाहिली त्यांना खात्री होती की हाय कमांडचे आदेश आल्यावर आपणच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होणार.

मात्र काँग्रेसने मोतीलाल व्होरा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आणि माधवराव सिंधिया यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले. अगदी वडिलांप्रमाणेच ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही मुख्यमंत्री होण्याची संधी थोडक्यात हुकली. त्यांच्याजागी 72 वर्षीय कमलनाथ यांची वर्णी लागली आहे. आपल्यावर नशीबच रुसलं अशी भावना माधवराव सिंधिया यांच्या मनात आली असेल आणि योगायोगाची बाब म्हणजे 30 वर्षांनी ज्योतिरादित्य सिंधियाही हेच म्हणत असावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 3:05 pm

Web Title: 30 years on scindia misses out on cms post like dad
Next Stories
1 …म्हणून कपिल सिब्बल अमित शाहांना देणार ‘दुर्बीण’ भेट
2 कर्नाटक प्रसाद विषबाधा प्रकरण, 11 मृत्यू प्रकरणी दोघे अटकेत
3 राफेल प्रकरणात केंद्र सरकारने कोर्टात चुकीची माहिती दिली: शरद पवार
Just Now!
X