News Flash

शेतकरी मोर्चात गोंधळ घालण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स; पोलिसांचा दावा

ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्याचा प्रयत्न

संग्रहित (PTI)

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी तसंच प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाकिस्तानमधील ३०० ट्विटर हॅण्डल्सची माहिती सापडली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. ट्रॅक्टर मोर्चाबद्दल माहिती देताना विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असं सांगितलं आहे.

“लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल इतर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. मात्र तरीही प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत मोर्चा काढला जाईल,” अशी माहिती दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे.

“पाकिस्तानमधील दहशतवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करु शकतात असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत,” असं त्यांनी सांगितलं आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. यामध्ये खासकरुन पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत. कायदे रद्द केले जावे ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून यावर ते ठाम आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चा काढला जाऊ नये अशी विनंती केली असताना शेतकरी मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 8:01 am

Web Title: 300 pak twitter handles created to disrupt farmers rally sgy 87
Next Stories
1 एक दोन नाही तब्बल ३१ वेळा ‘ति’च्या करोना चाचणीचे रिपोर्ट्स आले पॉझिटिव्ह
2 “टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही…,” शिवसेनेची खोचक टीका
3 नेपाळच्या पंतप्रधानांची पक्षातून हकालपट्टी
Just Now!
X