20 November 2017

News Flash

इस्रायली हल्ल्यात ३१ पॅलिस्टिनी ठार

गाझा शहर : गाझा पट्टय़ातील हिंसाचार पराकोटीला पोहोचला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढतच

मंगळवार, २० नोव्हेंबर २०१२ | Updated: November 20, 2012 4:13 AM

गाझा शहर : गाझा पट्टय़ातील हिंसाचार पराकोटीला पोहोचला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढतच असून आतापर्यंतच्या  हिंसाचारात रविवारी ३१ पॅलिस्टिनी ठार झाले आहेत. गाझा पट्टीतील हा हिंसाचार थांबवण्यासाठी राजनैतिक स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून सोमवारी किंवा मंगळवारी युद्धबंदी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सहा दिवसांत गाझा पट्टीतील हिंसाचारात ७७ पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे.हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीत मोठय़ा प्रमाणात रक्तपात सुरू आहे. रविवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुले असून त्यामध्ये पाच लहान बालकांचाही समावेश आहे. या हल्ल्यामुळे लहान मुले आणि महिलांचा अधिक बळी गेल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.      

गाझा हिंसाचार थांबवण्याची चीनची विनंती
गाझा पट्टीत सध्या सुरू असलेल्या हिंसाचारा    बद्दल चीनने चिंता व्यक्त केली आहे. गाझा पट्टीतील हिंसाचार थांबवण्यासाठी इस्रायल आणि इतर संघटनांनी सबुरीचे धोरण स्वीकारावे आणि तातडीने युद्धबंदी जाहीर करून निरपराध नागरिकांचा बळी जाऊ नये यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सोमवारी केले आहे.  

First Published on November 20, 2012 4:13 am

Web Title: 31 palestineans killed in israeli attack