25 October 2020

News Flash

1984 शीख दंगल : 34 जणांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन

1984 मध्ये देशभर शिखांच्या विरोधात भडका उडाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयाने 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलीतील 34 जणांना जामीन मंजुर केला आहे. यापूर्वी 5 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सात जणांना जामीन मंजूर केला होता.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाकडूनच हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर 1984 मध्ये देशभर शिखांच्या विरोधात भडका उडाला. 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील केट परिसरातील पालम वसाहतीमध्येही दंगल झाली. या दंगलीत सहा जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार, बलवान खोक्कर, महेंद्र यादव, गिरधारी लाल, किशन खोक्कर आणि कॅप्टन भागमल यांच्यावर आरोप होते. अहुजा समितीच्या अहवालानुसार 1984 च्या शीखविरोधी दंगलीत 2 हजार 733 शीख ठार झाले होते. या प्रकरणात 650 खटले दाखल करण्यात आले होते. तसेच त्यामध्ये 3 हजार 163 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने 34 जणांना जामीन मंजुर केला.

यापूर्वी 5 जुलै रोजी या प्रकरणातील 7 जणांना जामीन मंजुर करण्यात आला होता. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायलयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात समिक्षा याचिका दाखल केल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात संशियत आरोपींवर आरोप निश्चिती झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली असून ती अद्याप प्रलंबित आहे. यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील 34 जणांना जामीन मंजुर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 3:54 pm

Web Title: 34 accused gets bail supreme court 1984 anti sikh riots delhi pm indira gandhi ranjan gogoi jud 87
Next Stories
1 काश्मीरप्रश्नी ट्रम्पना विनंती केली होती का? मोदींनी देशाला खरं सांगावं : राहुल गांधी
2 अनाथ तान्ह्या बाळाला स्तनपान करणाऱ्या महिला पोलिसाचा गौरव
3 ‘हे’ आहेत सर्वाधिक खोटे बोलणारे राष्ट्रप्रमुख
Just Now!
X