दिल्लीत द्वारका भागातील एका गोशाळेमध्ये ३६ गायी मृतावस्थेत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास पोलिसांना गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. एकाचवेळी इतक्या मोठया प्रमाणावर गायींचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या गोशाळेमध्ये एकूण १४०० गायी आहेत. त्यातील ३६ गायींचा मृत्यू झाला आहे. कुठल्या तरी रोगामुळे इतक्या मोठया प्रमाणावर गायींचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. काल या गोशाळेतील दोन गायींचा मृत्यू झाला होता. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.