‘आयर्न लेडी’ मार्गारेट थॅचर यांच्या अंत्यविधीसाठी १६ लाख पौंड व त्यावेळी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर २० लाख पौंड ब्रिटिश करदात्यांच्या रकमेतून खर्च झाल्याचे जाहीर करण्यात आल्यावर नागरिकांमध्ये काही प्रमाणात संताप निर्माण झाला. ब्रिटनच्या अर्थसंकल्पात मोठी तूट येत असल्याने ती कमी करण्यासाठी सार्वजनिक खर्चात कमी केली जात असताना हुजूर पक्षाच्या नेत्या असलेल्या मार्गारेट थॅचर यांच्या अंत्ययात्रेवर इतका खर्च कशासाठी करण्यात आला असा सवाल डाव्या कार्यकर्त्यांनी केला आहे.