News Flash

मुहूर्तावर दफन करण्यासाठी तो आईच्या मृतदेहासमोर १८ दिवस बसला

आईचा मृतदेह आणखी ३ दिवस कुजण्याची वाट पाहून २१ दिवसानंतर दफनविधी करणार होतो, असे मुलाने सांगितले.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

कोलकातातील साल्ट लेक भागातील एका दुमजली घरात ३८ वर्षाचा मुलगा मागील १८ दिवसांपासून आपल्या ७७ वर्षे वयाच्या आईच्या मृतदेहाबरोबर राहत होता. कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी बाहेर जाऊ नये, म्हणून त्याने घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद केले होते. त्याने आपल्या एका नातेवाईकाला बीडन स्ट्रीट येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करायला सांगितल्यानंतर
ही गोष्ट उजेडात आली. मैत्रेय भट्टाचार्य असे मुलाचे नाव असून कृष्णा भट्टाचार्य असे त्याच्या मृत आईचे नाव आहे.

मैत्रेयने दिलेल्या माहितीनुसार, त्याने व त्याच्या आईने ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यानुसार तो २१ व्या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर आईला दफन करणार होता. घरात काय झाले याची कोणालाच माहिती नाही. दुर्गंधी पसरल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. रविवारी रात्री १० वाजता जेव्हा घटनास्थळी पोलीस आले. तेव्हा मैत्रेय आईच्या मृतदेहाजवळ बसलेला दिसला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. कृष्णा भट्टाचार्य यांचा मृत्यू १८ दिवसांपूर्वी झाला होता. मी आईचा मृतदेह आणखी ३ दिवस कुजण्याची वाट पाहून २१ दिवसानंतर दफनविधी करणार होतो, असे मैत्रेयने पोलिसांना सांगितले.

कृष्णा या भवानीपूर येथील मुलींच्या शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. तर त्यांचे पती गोराचंद भट्टाचार्य एसएसकेएम रूग्णालयात मेंदूविकार तज्ज्ञ होते. वर्ष २०१३ मध्ये गोराचंद यांचे निधन झाले होते. गोराचंद यांचाही मृतदेह संशयित अवस्थेत आढळला होता, अशी माहिती मैत्रेयच्या शेजारच्यांनी दिली.

सोमवारी सांयकाळपर्यंत विद्यानगर पोलिसांना मैत्रेयच्या या कृत्यामागचे कारण समजू शकले नव्हते. दरम्यान, कृष्णा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 5:15 pm

Web Title: 38 year old youth was living with mothers dead body from 18 days
Next Stories
1 AgustaWestland Scam : मिशेलची युपीएच्या बैठकांपर्यंत होती पोहोच!
2 धक्कादायक ! बलात्कार पीडितेवर मदतीच्या नावाखाली अनोळखी लोकांनीही केला अत्याचार
3 पंजाबमध्ये राजीव गांधींच्या पुतळ्याला काळे फासले
Just Now!
X