तृतीयपंथींना आता केंद्रीय सशस्तर पोलीस दलात आधिकारी होण्याची संधी मिळाणार आहे. सीआरपीएफ, आईटीबीपी, एसएसबी आणि बीएसएफ या दलांनी तृतीयपंथींना कॉम्बैट ऑफिसर पदांवर भरती करण्यासाठी गृह मंत्रालयाला हिरवा कंदील दाखवला आहे. पण देशातील ६० पेक्षा जास्त विमानतळावर सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआईएसएफने यासाठी सरकारकडे आणखी वेळ मागितला आहे.

तृतीयपंथींना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आधिकारी पदांवर भरती केलं जाऊ शकतं का? या मुद्द्यावर गृह मंत्रालयाने देशातील पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडून अहवाल मागवला होता. या अहवालात सकारात्मक प्रतिसाद आल्यास केंद्रीय लोक सेवा आयोगाला (यूपीएससी) पुढील होणाऱ्या सीएपीएफएस सहायक कमांडेंट परीक्षेच्या अधिसूचनेत ‘ट्रांसजेंडर’ श्रेणीचा समावेश करण्यात सांगण्यात येणार होतं.

सहायक कमांडेट पाच सीएपीएफएस – केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआईएसएफ), भारत-तिब्बत सीमा पोलीस (सीआईएसएफ) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी)मध्ये आधिकाऱ्यांची पदे आहेत. बीएसएफ, आईटीबीपी, एसएसबी आणि सीआरपीएफ आपला अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही तृतीयपंथींना आधिकारी म्हणून स्वीकारण्यास तयार आहोत.