News Flash

४ किलो सोनं, ६१० किलो चांदी, ११ टीव्ही, १० फ्रिज; जयललितांची मालमत्ता ताब्यात

तामिळनाडू सरकारने या कारणासाठी घेतला निर्णय

तामिळनाडू सरकारने राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या दिवंगत पक्षप्रमुख जयललिता यांच्या पोएस गार्डन या निवासस्थानातून ४ किलो सोनं, ६१० किलो चांदी, ८ हजार ३७६ पुस्तकं, ३८ एसी, १० हजार ४३८ ड्रेसेस अशी सगळी मालमत्ता ताब्यात घेतली आहे. तामिळनाडू सरकार जयललिता यांचं स्मारक तयार केलं जाणार आहे. या स्मारकात काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे या वस्तू तामिळनाडू सरकारने ताब्यात घेतल्या आहेत.

काय काय ताब्यात घेण्यात आलं आहे?
४ किलो सोनं
६१० किलो चांदी
११ टीव्ही
१० फ्रिज
२९ टेलिफोन आणि मोबाइल्स
१०८ कॉस्मॅटिक आयटम्स
३९४ सन्मानचिन्हं
६ घड्याळं

या सगळ्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापैकी काही निवडक वस्तू या त्यांच्या स्मारकात ठेवल्या जाणार आहेत. तामिळनाडू सरकारने जयललिता यांच्या वेदा निलयम या तीन मजली घराचं स्मारकात करण्याचा निर्णय घेतला आहे. जयललिता यांच्या दिवंगत आईने हे घर विकत घेतल होतं. या स्मारकात प्रदर्शनही असणार आहे. या प्रदर्शनात पोएस गार्डन या निवासस्थानातील अनेक वस्तू ठेवल्या जाणार आहेत. तामिळनाडू सरकारने जयललिता यांच्या घरातून सोनं, चांदी, पुस्तकं आणि कपड्यांसह अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

तामिळनाडू सरकारच्या अधिग्रहणाला जयललिता यांच्या कायदेशीर वंशजांनी विरोध केला आहे. जयललिता यांचा पुतण्या दीपक आणि पुतणी दीपा यांनी राज्य सरकारचा विरोध केला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी जयललिता यांच्या निवासस्थानाचं रुपांतार स्मारकात व्हावं यासाठी निवासस्थान सरकारने ताब्यात घ्यावं असे आदेश दिले होते. राज्यपालांनी दिलेल्या आदेशानंतर मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या नेतृत्त्वात जयललिता फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनचे सदस्य इतर मंत्रीही आहेत. तामिळनाडू सरकारने वेदा निलयम ताब्यात मिळवण्यासाठी २५ जुलै रोजी सिव्हिल कोर्टात ६७.९ कोटी जमा केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 7:50 pm

Web Title: 4 kg gold 8376 books among jayalalithaa properties listed by tamil nadu government scj 81
टॅग : Jayalalitha
Next Stories
1 करोना संकटात दिलासा! भारताचा रिकव्हरी रेट ७.८५ वरुन ६४.४ टक्क्यांवर
2 करोनावर मात करण्यासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय नाही, केंद्राने केलं स्पष्ट
3 “देशातल्या १६ राज्यांचा रिकव्हरी रेट सरासरीपेक्षाही चांगला”
Just Now!
X