News Flash

छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत.
सुकमा जिल्ह्यातील अर्णपूर भागात स्पेशल टास्क फोर्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस अधिका-यांनी दिली आहे. यानंतर सुरक्षा रक्षकांकडून राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत नक्षलवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2015 12:52 pm

Web Title: 4 naxalist womans killed
टॅग : Naxal
Next Stories
1 ‘चीनमधील आर्थिक स्थितीचा भारतावरही परिणाम’
2 मजबूत लढाऊ ड्रोन विमानाची चीनकडून निर्मिती
3 आयसिसविरोधी लढय़ासाठी संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ सज्ज
Just Now!
X