उत्तर प्रदेशमधील इटावा येथे सोमवारी एक मोठा रेल्वे अपघात घडला. या ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसच्या धडकेने चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा पेक्षा अधिकजण जखमा झाले. अवध एक्स्प्रेसला लूप लाइनवर थांबवून राजधानी एक्स्प्रेसला जाऊ दिल्या जात असताना ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेस्थानकावर गोंधळ निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राप्त माहितीनुसार हे चारही जण इटावाच्या बलरई रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाशेजीरीच उभे होते व ते मुज्जफरपुरहून बांद्रा जाणा-या अवध एक्स्प्रेसचे प्रवासी होते. अवध एक्स्प्रेस सकाळी ६ वाजता बलरई स्थानकावर पोहचली होती. तर साधारण सात वाजता राजधानी एक्स्प्रेस या ठिकाणी आली होती.

यादरम्यान उकाड्याने हैराण झालेले अनेक प्रवाशी रेल्वेतुन उतरून रेल्वे रूळावर थांबले होते. त्याचवेळी राजधानी एक्स्प्रेस तिथुन गेली व तिची धडक अनेक प्रवाशांना बसली यात चार जणांचा मृत्यू झाला तर सहपेक्षा अधिक जखमी झाले. जखमींना तातडीने सैफई व टुंडला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.