News Flash

दिल्लीत पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार; अक्षरधाम मंदिराजवळची घटना

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून शोध मोहीम

दिल्लीतील अक्षरधाम मंदिरासमोरील या परिसरात गोळीबाराची घटना घडली.

एका चारचाकीतून जाणाऱ्या चौघांनी पोलिसांवर गोळाबार केल्याची घटना समोर आली आहे. अक्षरधाम मंदिरांसमोर ही घटना घडली असून, त्यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित फरार झाले आहेत. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

चार आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून जात होते. दिल्ली पोलिसांच्या पथकाने अक्षरधाम मंदिराजवळ त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर गाडीतील सशस्त्रधारी संशयितांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबार करताच आरोपी फरार झाले. आरोपी गीता कॉलनीच्या दिशेने बेपत्ता झाले.

दरम्यान, या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 12:57 pm

Web Title: 4 unidentified fired at police team near akshardham temple in new delhi bmh 90
Next Stories
1 पुणे : “हा तर हिंदू धर्माचा, प्रभू श्रीरामाचा अपमान”; शशी थरुर यांचा सरकारवर हल्लाबोल
2 #HowdyModi : हे अशक्यच… ह्युस्टनला यायचं आणि ऊर्जेसंदर्भात चर्चा करायची नाही : मोदी
3 Video : मोदी अमेरिकेत पोहोचले…पण, विमानातून उतरताच खाली का वाकले?
Just Now!
X