चेन्नईत केसावर प्रक्रिया करणाऱ्या एका दुकानातून केस चोरल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, याप्रकरणी आणखी दोन आरोपींचा शोध देखील सुरू आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या तिघांकडून ४० किलो केस जप्त करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. या केसांची किंमत जवळपास सहा लाख रुपये इतकी आहे.
दुकानातून केस चोरी झाल्याची तक्रार दुकानाचे मालक सेल्वी यांनी पोलिसांत केली होती. सेल्वी यांचा केस प्रक्रियेचा मोठा व्यवसाय असून, परदेशात या केसांची विक्री होते.