कोतवाली भागात एका खासगी बसच्या वाहक व चालकाने चाळीस वर्षे वयाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. ही महिला बस स्थानकावर काल रात्री बसची वाट बघत होती, तेव्हा चालक ब्रिजेंद्र व वाहक जितेंद्र यांनी तिला बसमध्ये ओढले व नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेशकुमार यांनी सांगितले. या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला असता स्थानिक लोक आले व त्यांनी वाहक-चालक यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.