मध्यप्रदेशातील भोपाळ शहराजवळील रायसेन जिल्ह्यातील मंदिदीप औद्योगिक भागातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे सुमारे ४१ कर्मचारी शनिवारी वायुगळतीमुळे आजारी पडले. या सर्व कर्मंचा-यांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये जळजळ; तसेच उलट्या होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, असे येथील पोलिस स्थानकामधील मुख्य अधिकारी नरेंद्र सिंह यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४१ कर्मचा-यांपैकी ३८ जणांवर गितांजली या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर इतर तीन जणांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना भोपाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.