News Flash

पाकिस्तानातील अपघातात ४२ ठार

सुक्कुर जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरला बसची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील ४२ प्रवासी ठार आणि अनेकजण जखमी झाले असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश

| April 21, 2014 03:00 am

सुक्कुर जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरला बसची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील ४२ प्रवासी ठार आणि अनेकजण जखमी झाले असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस ट्रेलरवर धडकली.
सदर बस डेहरा गझनीखान येथून कराची येथे जात असताना सुक्कुरजवळच्या पानो अकील भागात हा अपघात घडला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरला ही बस धडकल्याचे पोलिसांनी सांगितले. या बसमध्ये ६०हून अधिक प्रवासी होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2014 3:00 am

Web Title: 42 killed in road accident in south pakistan
Next Stories
1 हल्लेखोरांना पकडण्यासाठी १ कोटींचे इनाम
2 वनस्पती व प्राणी नष्ट होण्याच्या वेगाबाबतचे दावे अतिरंजित
3 गुजरात मॉडेल’ हे जणू राजकीय चलनच-अहलुवालिया
Just Now!
X