भाजपाला हुलकावणी देत कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या साथीने धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अस्तित्वात आले. मोठ्या थाटामाटात एचडी कुमारस्वामी यांचा शपथविधी पार पडला. देशातील भाजपा विरोधी सर्व पक्षांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. पण माहिती अधिकारांतर्गत समोर आलेल्या माहितीमुळे सर्वांचेच डोळ विस्फारले आहेत. कुमारस्वामींच्या काही मिनिटांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल ४२ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या खिशातून कररूपाने गोळा केलेल्या पैशातून हा सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे ‘आम आदमी’ पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर १.८५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत.
‘बेंगळुरू मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारने सात मिनिटांच्या शपथग्रहण सोहळ्यावर ४२ लाख रूपये खर्च केले होते. अरविंद केजरीवाल यांनी ताज वेस्ट एंडमध्ये २३ मे रोजी सकाळी ९.४९ वाजता चेक इन केले. आणि २४ मे रोजी सकाळी ५.३४ वाजता चेकआऊट केले. ज्या दिवशी ते आले त्यादिवशी इन-रूम डायनिंग, खाण्या-पिण्याचे बिल ७१०२५ रूपये आणि बेव्हरेजचे ५००० रूपयांचे बिल झाले.
यापूर्वी १३ मे २०१३ रोजी सिद्धरामय्या आणि १७ मे २०१८ रोजी बीएस येडियुरप्पा यांच्या शपथविधीवेळी सरकारने पाहुण्यांवर खर्च केला नव्हता. कुमारस्वामींच्या शपथविधीसाठी ४२ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 3:41 pm