गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून लडाख व सिक्कीम सीमेवर चीनकडून मोठय़ा प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न झाल्यानंतर आणि त्यातून उडालेल्या चकमकींमध्ये आपल्याकडे लष्करी अधिकारी आणि काही जवानांचे प्राण गेले. संघर्षानंतर चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. या संघर्षानंतर भारतीय नागरिकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. त्यानंतर ‘चीनला धडा शिकवण्याच्या’ ऊर्मीतून अनेक भारतीयांनी चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्या नंतर नागरिकांनी चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम म्हणून एका वर्षात ४३ टक्के भारतीयांनी कोणतीही चिनी वस्तू खरेदी केलेली नाह अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

चिनी अॅप्सवर घालण्यात आली होती बंदी

कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकलसीर्क्ल्सच्या सर्वेक्षणानुसार, चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या वस्तू विकत घेतलेल्या लोकांनी असे म्हटले आहे की त्यांनी फक्त दोन किंवा दोनदा असे केले आहे. केंद्राने १०० हून अधिक अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्यावर भर दिल्यावर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. गेल्या वर्षी चीनच्या सीमेवर रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने टिक टॉक, अली एक्सप्रेससह अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

बहिष्कार! ‘टोक्यो ऑलम्पिक’च्या तोंडावर भारताने चिनी कंपनीसोबतचा करार तोंडला

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि अनेक चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लोकलक्रिल्सनेही असेच सर्वेक्षण केले होते, त्यानुसार ७१ टक्के लोकांनी त्यावेळी चीनमध्ये बनवण्यात आलेले कोणतेही सामान विकत घेतले नव्हते.

हे ही वाचा >> समजून घ्या: ‘मेड इन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘असेंबल्ड इन इंडिया’ प्रोडक्टमधील फरक

या सर्वेक्षणासाठी सद्य सर्वेक्षणात देशातील २८१ जिल्ह्यांतील १८,००० लोकांचा समावेश होता. सर्वेक्षणातील बहुतेक लोकांनी चिनी वस्तूंच्या खरेदीमागे कमी किंमती आणि पैशांची बचतीचे कारण दिले होते. चीनमध्ये बनवलेल्या उत्पादनांची गुणवत्तेवरुन वस्तू खरेदी करण्याचे कारण काहींनी सांगितले होते. गेल्या एका वर्षात, ज्या ७० टक्के लोकांनी चिनी वस्तू विकत घेतल्या त्यांनी त्या वस्तू स्वस्त असल्याचे कारण दिले. १४ टक्के नागरिकांनी गेल्या वर्षभरात ३ ते ५ वस्तू खरेदी केल्या आहेत. तर ७ टक्के लोकांनी वर्षभरात ५ ते १० चिनी वस्तू खरेदी केल्या आहेत.