04 August 2020

News Flash

गेल्या २४ तासांत देशात १९,१४८ करोनाबाधितांची नोंद; एकूण संख्या ६ लाखांवर

२४ तासांत ४३४ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८८१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

दरम्यान, आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार १ जुलै पर्यंत एकूण ९० लाख ५६ हजार १७३ नमूने तपासले असल्याची माहिती दिली. यापैकी २ लआख २९ हजार ५५८ नमून्यांची चाचणी बुधवारी करण्यात आली. गेल्या १२ दिवसांमध्ये देशात तब्बल २ लाख करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सध्या ६० टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जगभरात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली आहे. तर जगभरात आतापर्यंत ५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 10:23 am

Web Title: 434 deaths and 19148 new covid19 cases in the last 24 hours positive cases in india stand at 604641 jud 87
Next Stories
1 २३ वर्षांपूर्वी प्रियंका गांधींना मिळाला होता लोधी इस्टेटमधील बंगला; जाणून घ्या किती आहे भाडं?
2 ‘या’ देशात ३५० हून अधिक हत्तींचा रहस्यमय मृत्यू; विषप्रयोग की आणखीन काही?
3 भारताच्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीला अमेरिकेचं समर्थन; म्हणाले…
Just Now!
X