अमेरिकेत २५ फूटांची ३० हजार किलो (४५ टन) वजनाची हनुमानाची मूर्ती उभारण्यात आली आहे. येथील डेलावेअर राज्यामध्ये ही मूर्ती उभारण्यात आली आहे. यासंदर्भातील काही फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटवरुन शेअर केले आहेत. डेलावेअरमध्ये भारतीय मोठ्या संख्येने राहतात. इथे एक मोठे मंदीरही याच मंदीर परिसरामध्ये ही मूर्ती उभारण्यात आली आहे.

डेलावेअर येथील न्यॅ कॅसल काऊण्टीमधील हॉकसॅन येथे हनुमानाची मोठी मुर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती भारतामध्ये तयार करुन नंतर अमेरिकेमध्ये नेण्यात आली आहे. यासंदर्भात हॉकसॅन येथील हिंदू टेम्पल ऑफ डेलावेअर असोसिएशनचे अध्यक्ष पातीबंदा शर्मा यांनी एएनआयशी संवाद साधला. “या मूर्तीचे वजन ४५ टन इतके आहे. ही मूर्ती आम्ही तेलंगणामधील वारंगल येथून डेलावेअरला आणली आहे,” असं शर्मा यांनी सांगितलं. भारतामध्ये ही मूर्ती तयार करुन अमेरिकेमध्ये नेण्यासाठी एक हजार डॉलपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. शेकडो कारागीर मागील एक वर्षापासून ही मूर्ती घडवण्याचं काम करत होते. ही संपूर्ण मूर्ती एका ग्रॅनाइड खडकामधून साकारण्यात आली आहे.

 

जानेवारी महिन्यामध्येच ही मूर्ती हैदराबादवरुन न्यू यॉर्कला पाठवण्यात आली. त्यानंतर ती डेलावेअरला नेण्यात आली. त्यानंतर या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी  बेंगळूरूवरुन नागराज भत्तार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या मुर्तीची पूजा अर्चना करुन तिची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.ॉ