देशातील करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट दाखत असली तरी देशातील मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांतील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगानं वाढायला लागली आहे. दिल्लीत तर करोनाची तिसऱी लाट सदृश्य स्थिती असल्याचे मत आरोग्य विभागानं नोंदवलं आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या चोवीस तासांत देशात नव्याने ४८,२६८ रुग्ण आढळून आले तर ५५१ जणांचा मृत्यू झाला.

नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८१,३७,११९ वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या १,२१,६४१ वर पोहोचली आहे. तसेच ५९,४५४ रुग्ण व्यवस्थित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४,३२,८२९ वर पोहोचली आहे.