News Flash

कोलकात्याला जाणारी पाच विमाने धुक्यामुळे भुवनेश्वरला उतरवली

आम्ही विमानतळावर या पाच विमानांना उतरवले पण त्यात धुक्याचे प्रमुख कारण होते.

| December 20, 2015 12:17 am

कोलकात्याकडे जाणारी पाच विमाने एकाचवेळी आपत्कालीन कारणास्तव ओदिशातील भुवनेश्वर येथे असलेल्या बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावी लागली. त्यात एक आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानही होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यमानता कमी असल्याने ही पाचही विमाने पहाटे चार वाजता येथे उतरवण्यात आली त्यात दिल्लीहून कोलकात्याला जाणारी दोन व मुंबईहून कोलकात्याला जाणारे एक तर ढाक्याहून कोलकात्याला जाणारे एक अशी पाच विमाने होती असे विमानतळाचे संचालक शरदकुमार यांनी सांगितले.
आम्ही विमानतळावर या पाच विमानांना उतरवले पण त्यात धुक्याचे प्रमुख कारण होते, आता त्यातील एक विमान मार्गस्थ झाले आहे. अनेक प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये व विमानतळाच्या टर्मिनलवर व्यवस्था करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 12:17 am

Web Title: 5 aircraft takeoff in bhubaneswar because fog
Next Stories
1 सीरियासंबंधी शांतता ठराव संमत
2 हरयाणातील भूखंड वाटपाची चौकशी
3 उत्तर प्रदेश लोकायुक्तांचा शपथविधी लांबणीवर
Just Now!
X