04 March 2021

News Flash

काश्मीर : पंपोरमध्ये दहशतवादी हल्ला; सीआरपीएफचे दोन जवान शहीद, तीन जखमी

सीआरपीएफच्या गस्ती पथकावर गोळीबार

पंपोर : येथे सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात दोन जवान शहीद झाले. यावेळी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, पंपोर बायपास येथे गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीच्या (आरओपी) पथकावर काही दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. यामध्ये पाच जवान जखमी झाले होते, त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, उपचार सुरु असताना दोन जवानांचा मृत्यू झाला.

दहशतवादी हल्ल्यानंतर येथील महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 2:29 pm

Web Title: 5 crpf men injured in terrorist attack in south kashmirs pampore aau 85
Next Stories
1 एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास तयार, IAF प्रमुखांचं मोठं विधान
2 हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांचा दावा
3 तामिळनाडूतील लोकांना रेल्वेचे SMS हिंदीत कशासाठी?, DMK चा रेल्वे मंत्रालयाला प्रश्न
Just Now!
X