News Flash

ट्रकचा भीषण अपघात! पाच कामगार जागीच ठार, ११ जण गंभीर जखमी

शनिवारी मध्यरात्रीची घटना

सग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणखी एका घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या भीषण अपघातात पाच कामगार जागीच ठार झाले, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ ही घटना घडली.

लॉकडाउनमुळे प्रवासाच्या सुविधा बंद आहेत. विशेषतः राज्यांबरोबरच जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक मजूर पायीच घरी जात आहेत. अशाच प्रकारे घरी जात असताना जालना-औरंगाबाद दरम्यान रेल्वे मार्गावर १६ जणांना रेल्वेनं चिरडलं होतं. या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच आणखी एका अपघातात ५ मजूरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मध्य प्रदेशातील नरसिंगपूरजवळ असलेल्या पाथा गावानजिक एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघातात झाला. आंब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये १८ मजूर होते. हा ट्रक हैदराबादवरून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जात होता. दरम्यान, पाथाजवळ ट्रक उलटला. यात पाच मजूर जागीच ठार झाले. ११ मजूर गंभीर झाले आहेत. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

At least five migrant labourers killed and 13 others injured when truck carrying them overturned in Madhya Pradesh’s Narsinghpur district: Police

तेलंगानातील हैदराबाद येथून आग्रा येथे जाणाऱ्या या ट्रकमध्ये १८ मजूरही आग्रा येथे जात होते, असं त्यांनी सांगितलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 9:12 am

Web Title: 5 labourers dead 11 injured after truck overturns bmh 90
Next Stories
1 CoronaVirus/Lockdown : पुण्यात आणखी तीन पोलिसांना करोनाची लागण
2 ‘त्या १६ मजुरांच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब’
3 अतिवाईट स्थितीलाही तोंड देण्यास देश सज्ज
Just Now!
X