इ.स. २००२ मधील नरोडा पडिया दंगलप्रकरणी २८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांचे या प्रकरणातील दोषित्व निलंबित करण्यात आलेले नाहीतर ती टंकलेखनाची चूक होती, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही. एम. सगाय व न्या. आर. पी. ढोलारिया यांनी सांगितले, की गेल्या सोमवारी दिलेल्या आदेशात ही बाब स्पष्ट केली आहे. कोडनानी यांच्या वकिलांनी आदेशाबाबत स्पष्टीकरण मागितले असता न्यायालयाने हा खुलासा केला आहे.
कोडनानी यांच्यावतीने जामीनअर्ज दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याचा उल्लेख कोठेही नव्हता पण ती टंकलेखनाची चूक होती. परिच्छेद १९ मध्ये चौथ्या ओळीत दोषी असल्याचा शब्द २० जुलै २०१४च्या आदेशात आलेला आहे, असे विभागीय पीठाने म्हटले आहे.