03 March 2021

News Flash

VIDEO : दोन ट्रकमध्ये सापडून कारचा चेंदामेंदा, पाच ठार

अपघातात एक महिला आणि दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

अपघाताचे सीसीटीव्ही फुटे

निजामाबाद-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. टेकरियाल बायपास जंक्शनजवळ ही दुर्घटना घडली. कार चालक डाव्याबाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक आणि कारच्या मागच्याबाजूची टक्कर होऊन ट्रकबरोबर कार ढकलली जाऊ लागली. तेव्हढ्यात पुढील बाजूने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही ट्रकच्यामध्ये येऊन कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात दोन लहान मुले आणि एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत करावी लागली. कारचे भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. हा भीषण अपघात कमारेड्डी बायपासवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 2:59 pm

Web Title: 5 of family killed in car accident on hyderabad nizamabad highway video
Next Stories
1 ‘काँग्रेसमुक्त भारत’चा चुकीचा अर्थ काढला जातोय- अमित शहा
2 मच्छीमार हत्येप्रकरणी इटलीतील नाविकाला मायदेशी जाण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी
3 Modi Government: स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मोदी सरकारकडून १००० कोटींची उधळपट्टी, केजरीवाल यांचा आरोप
Just Now!
X