News Flash

१७५ कोटींच्या अंमलीपदार्थासह पाच पाकिस्तानी अटक

गुजरात एटीएस व भारतीय तटरक्षक दलाची संयुक्त कारवाई

संग्रहीत

गुजरात पोलिसांच्या दहशतवादा विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाबरोबर राबवलेल्या संयुक्त मोहीमेद्वारे पाच पाकिस्तानी नागरिकांना सोमवारी तब्बल १७५ कोटी रुपयांच्या अंमलीपदार्था (हेरोईन)सह गुजरातमधील कच्छ किनारपट्टीतील मध्य समुद्री भागातून ताब्यात घेतले.

गुजरातच्या किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणवर अंमलीपदार्थांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून भारतीय तटरक्षक दलास मिळाली होती. या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तसेच, १६०० किलोमीटरच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यास सज्ज देखील आहोत. गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाबरोबर राबवलेल्या संयुक्त अभियानात पाच पाकिस्तानी नागरिकांना १७५ कोटी रुपयांच्या अंमलीपदार्थांसह अटक केली आहे. अशी माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी ट्विटरद्वारे दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:24 pm

Web Title: 5 pakistanis with heroin worth %e2%82%b9175 cr nabbed msr 87
Next Stories
1 “यापूर्वी कधी पाहिले नसतील असे भयानक निर्बंध लादू”, खवळलेल्या ट्रम्प यांची धमकी
2 Video: काही क्षणांमध्ये मारला गेला कासिम सुलेमानी; CCTV फुटेज आले समोर
3 आक्रमक इराणने अण्वस्त्र कार्यक्रमासंबंधी घेतला मोठा निर्णय
Just Now!
X