गाझियाबाद मधील खोडा परिसरात एक पाचमजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी साडे ८च्या सुमारास घडली. कोसळलेली इमारत ही धोकादायक घोषित करण्यात आली असून या इमारतीत कोणीही वास्तव्यास नव्हते. सध्या पोलीस, NDRF आणि इतर बचाव पथके घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.

खोडा परिसरात रात्री साडे ८ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीत कोणीही राहत नव्हते. तळमजल्यावर एक शोरूम होते. पण इमारतीची वाट स्थिती पाहता ती शोरुमदेखील बंद करण्यात आली होती.

ती इमारत ८ ते १० वर्षे जुनी होती. मात्र इमारत धोकादायक घोषित करण्यात आल्यामुळे इमारत रिकामी करण्यात आली होती. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. NDRF आणि इतर बचाव पथके घटनास्थळी कार्य करत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रितू महेश्वरी यांनी दिली.