गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चकमक झाल्याचे वृत्त असून यामध्ये ४ ते ५ नक्षलवादी ठार झाल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, पोलिसांच्या सी-६० भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्यातील गरंजी डोंगरात ही चकमक झाली. यामध्ये एक नक्षलवादी ठार झाल्याचे पोलीस सुत्रांकडून कळते. मात्र, मोठ्या प्रमाणावर आणि बराच काळ ती सुरु राहिल्याने यात आणखी ४ ते ५ नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

येथील दंडकारण्यात २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांसाठी शहीद दिवस पाळत नक्षलवाद्यांनी बंद पुकारला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या सी-६० पथकाकडून सध्या येथे कोबिंग ऑपरेशन सुरु आहे.