News Flash

सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठी! लोकांना त्या विकत घ्याव्या लागणार नाहीत, अदर पूनावालांचा दावा

करोनावर लवकरच येणार लस

ऑक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद आहे"

ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट तयार होणारी लसीसंदर्भातला अहवाल द लॅन्सेट या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसारित झाला. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी अदर पूनावाला यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. सिरमच्या ५० टक्के लसी या भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसंच यासाठी लोकांना कोणतीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा दावा सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केला आहे.

अदर पूनावाला यांनी काय म्हटलं आहे?

“या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि सगळे निकाल अगदी व्यवस्थित आले तर सिरम इन्स्टिट्युटही ऑक्सफर्डच्या साथीने या लसींचे उत्पादन करेल. या लसी तयार झाल्यानंतर सरकारकडूनच खरेदी केल्या जातील. त्यामुळे लोकांना त्या मोफत मिळू शकतात” असाही दावा पूनावाला यांनी केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

सिरम इन्स्टीट्युट ही भारतातली अशी कंपनी आहे जी जगभरातल्या लस उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. सध्याच्या घडीला करोनावर लस शोधण्यासाठीचे विविध प्रयत्न सुरु आहेत. अशात ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट यांच्या साथीने जी लस तयार करण्यात येते आहे त्याचा तिसरा टप्पा बाकी आहे. हा टप्पा भारतात घेतला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जेणेकरुन या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतात करता येईल असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

आम्ही सांगितलं की ५० टक्के लसी या भारतीयांसाठी असतील. तर ५० टक्के लसी या इतर देशांसाटी असतील. सरकारने या संबंधी आम्हाला पाठिंबा द्यावा. करोना है वैश्विक संकट आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सगळ्याच देशांना या लसींची गरज लागणार आहे. भारतासोबतच इतर देशांचीही आपण काळजी घेतली पाहिजे असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 10:05 pm

Web Title: 50 percent of covid vaccines will be for india people will have to buy them says adar poonawala scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 काँग्रेस जेवढी मागे जाईल, तेवढाच देश पुढे जाईल – बबिता फोगाट
2 देशविरोधी वक्तव्य करणारा शरजील इमाम करोना पॉझिटिव्ह
3 करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द
Just Now!
X