X
Advertisement

सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी करोनाबाधित; न्यायाधीश WFH

सुप्रीम कोर्टालाही करोनाचा फटका

देशात करोनाचा कहर वाढत असून सुप्रीम कोर्टालाही याचा मोठा फटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. एएनआयने सुप्रीम कोर्टातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचारी करोनाबाधित असल्याने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात येत आहे. अनेक खडंपीठ एक तास उशीरा सुनावणी घेणार आहेत.

एका न्यायाधीशाने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, माझे अनेक कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. काही न्यायाधीशांनाही करोनाची लागण झाली होती. पण त्यातून ते लवकर बरे झाले आहेत.

आणखी वाचा- भयावह रुग्णवाढ! देशात २४ तासांत आढळले १,६८,९१२ पॉझिटिव्ह रुग्ण

सुप्रीम कोर्टातील कर्मचारी करोनाबाधित झाल्याचा परिणाम सुनावणीवरही झाला आहे. सकाळी १०.३० वाजता होणारी सुनावणी सर्व खंडपीठांकडून एक तास उशिराने सुरु होणार आहे. तर ११ वाजता होणारी सुनावणी १२ वाजता सुरु होईल अशी माहिती अतिरिक्त निबंधकांनी दिली आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात भयावह स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ

भारतात करोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या आठवड्यात १० लाखांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. फक्त रविवारी देशात दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले. मृताची संख्याही वाढलेली असून रविवारी झालेल्या ८३९ मृत्यूसोबत मृतांची संख्या १ लाख ६९ हजार २७५ वर पोहोचली आहे.

23
READ IN APP
X