News Flash

उत्तर प्रदेशमध्ये प्रचारावर साडे पाच हजार कोटी खर्च?

एका मताची किंमत ७५० रुपये; अभ्यासातील दावा

एका मताची किंमत ७५० रुपये; अभ्यासातील दावा

नोटाबंदीच्या सावटाखाली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी एकुण ५,५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचा दावा सीएमएसच्या अभ्यासात केला आहे. या अभ्यासानुसार एक हजार कोटी रुपयांची रक्कम लोकांमध्ये वाटण्यात आली असुन एकतृतीयांश मतदारांनी आपल्याला मतदानासाठी पैसे किंवा मदय़ देऊ केल्याचे एका सर्वेक्षणात मान्य केले आहे.

यंदाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांतील प्रत्येक मताची किंमत अंदाजे ७५० रुपये आहे. हा आकडा देशातील इतर राज्यांशी तुलना करता सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधून जवळपास २०० कोटी आणि पंजाबमधून १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त केली गेली. त्याचप्रमाणे एक हजार कोटी रुपयांची रक्कम ही मतदारांमध्ये वाटण्यात आली आहे.

निवडणूक प्रचारांसाठी बऱ्याच पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. केवळ छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिराती, व्हिडीओ व्हॅन, स्क्रीन पोजेक्टर यांच्यावरच अंदाजे ६०० ते ९०० कोटींपर्यंत खर्च करण्यात आला.

उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेक्षणात भाग घेतल्यांपैकी ५५ टक्के नागरिकांनी पैसे घेऊन मतदान केलेल्या व्यक्तीला आपण वैयक्तिकरीत्या ओळखत असल्याचे किंवा यासंबंधी माहिती असल्याची कबुली दिली.

नोटाबंदीनंतर निवडणुकांमध्ये होणाऱ्या खर्चात अनपेक्षितरीत्या वाढ झाली आहे. ज्या मतदारसंघामध्ये अतितटीची स्पर्धा होती, त्या भागात मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी उमेदवारांकडून  ५०० ते २००० रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात सर्वेक्षणात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाकडून प्रत्येक उमेदवाराला २५ लाख रुपये निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्च करण्याची मुभा असते, तरीही उमेदवारांकडून प्रचारादरम्यान हे मर्यादेचे उल्लंघन होत असते.

मुख्यमंत्री आज ठरणार

नवी दिल्ली : एकीकडे डेहराडूनमध्ये उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा शपथविधी चालू असताना आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता लखनौमध्ये उत्तर प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली असेल. नेतानिवडीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. निकालाला आठ दिवस झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत कोणतेही स्पष्ट संकेत न मिळाल्याने नानाविध नावांचे पेवच फुटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून सात वेळा आमदार झालेले सतीश महाना यांच्यापर्यंत किमान दहा नेत्यांची नावे घेतली जात आहेत. अगदी भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांचीही चर्चा जोरजोरात चालू आहे. त्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांचा संदर्भ दिला जात आहे. या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ मंत्री व्यंकय्या नायडू आणि भूपेंद्र यादव हे केंद्रीय निरीक्षक आज (शनिवार) आमदारांच्या बैठकीमध्ये नेतानिवड जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवू शकणाऱ्यास मुख्यमंत्री केले जाईल, अशी टिप्पणी भाजपचे निवडणूकप्रमुख ओ. पी. माथूर यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:48 am

Web Title: 5000 crore rs spend in uttar pradesh assembly elections 2017
Next Stories
1 ताज महालला ‘आयसिस’कडून धोका असल्याचे संकेत
2 नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश
3 पंतप्रधान मोदींच्या सोशल मिडिया अकाउंट व्यवस्थापनाचा खर्च किती?, मिळाले हे उत्तर
Just Now!
X