देशभरात करोनाचे ५०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात समोर आलेली ही संख्या आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३ मृत्यू झाले आहेत. तर करोनाग्रस्तांची संख्या ही आता ४७८९ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या १२४ झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा यासाठी देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाउन आहे. अशात घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क लावावा अशा सगळ्या सूचना करण्यात येत आहेत. त्या सूचनांचं पालनही लोक करत आहेत. मात्र करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातलेही करोनाग्रस्त वाढले आहेत. एकट्या मुंबईतच करोनाग्रस्तांची संख्या ५०० च्या वर गेली आहे.

मुंबईत १०० नवे करोना पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात मुंबईतल्या रुग्णांची संख्या १०० ने वाढली आहे. त्यामुळे ही संख्या आता ४९० वरुन थेट ५९० इतकी झाली आहे. तर आज मुंबईत ५ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातले ट्विट करुन माहिती दिली आहे.